महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ सप्टेंबर ।। जगभरात सध्या अनेक उलथापालथी होत आहेत. एकीकडे रशिया-युक्रेन, तर दुसरीकडे इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. हिंदुस्थाचे शेजारील देश बांग्लादेश, पाकिस्तानमधील परिस्थितीही चिंतेची बाब आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठे विधान केले असून सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले.
हिंदुस्थान हा शांतताप्रिय देश आहे. पण शांतता टिकवून ठेवण्यासाठी सशस्त्र दलांना युद्धासाठी तयार राहण्याची गरज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. लखनऊ येथील पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.