महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी. के. महाजन – मानवाला जिवंत रहायचे असेल तर अन्न,पाणी व हवा-आॅक्सीजन ह्या तीन मुलभुत गरजा त्याच्या भागल्याच पाहीजेत. तीन पैकी हवा तर फुकटच मिळते आणि पाण्याचही फारस कठीण नाही तेही मिळेल पण अन्नाच काय? अन्न मिळवण्या साठी तर पैसा लागतो. पैसा तर कमवला पाहीजे. हातावर पोट असणारी गरीब माणसाला काम केले तर पैसा मिळतो. आणि लाॅकडावुन मुळे सर्वांचे उद्योग-काम धंदे बंद .त्यामुळे काम नाही तर पैसा नाही. पैसा नाही तर अन्न नाही. नुसती हवा खावून आणि पाणी पिऊन मानुस जगल कसा. म्हणजे पैसा हा माणसांचा ऑक्सीजन झाला आहे. पैशांशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. म्हणून या पुढे लाॅकडावुन शिथील झाले नाहीत तर अन्नाविना माणस मरायची वेळ येवू शकते. खरतर लाॅकडावुन हा माणस जिवंत रहावीत म्हणूनच आहे, ह्यात कुणाचही दुमत असु शकत नाही. अशा परिस्थितीत सरकार ने कोणताही निर्णय घेतला तर तो सर्वांसाठी पूरक ठरत नाही. ज्यांच्या घरात राशन आहे व बँकेत बॅलंस आहे त्यांना लाॅकडावुन अजुन किती ही दिवस राहीला तरी काही फरक पडणार नाही परंतू ज्याच्याकडे राशन नाही व बँकेत बॅलंस नाही त्यांच्यासाठी तर लाॅकडावुन म्हणजे यमच आहे.
सर्व सामान्य माणसांची आर्थीक क्षमता संपलेली आहे.मध्यम वर्गीय माणसं ज्यांनी घर किंवा उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे त्यांनाही नाईलाजाने लाॅकडावून नकोसा झाला आहे . बँकेचे हप्ता वसुली चे फोन व हप्ता वसुली एजंट दारात यायला लागलीत. दमदाटी करायला लागलीत. काही ठिकाणी तर अर्वाच्च भाषेत शिविगाळ मारामारी पर्यंत मजल गेली आहे हप्ते वसुली करणारयांची. सरकारने मोराटोरीयम पिरीयड वाढवून दिला आहे कायदा कर्जदाराच्या बाजूने आहे हे ही ठिक आहे पण सर्वांना कायद्याचा आधार घेता येत नाही. कारण त्यांना तितके ज्ञान नसते आणि असल तरी बरेच लोक घाबरतात. जास्त अपमान सहन करण्याची सहनशक्ती सर्वांकडे नसते शेवटी त्यांचा स्वाभिमान जागा होतो मग ह्या सामाजिक अपमानास्पद कटकट सहन करण्यापेक्षा चुकीचे विचार त्याच्या डोक्यात येतात.
बर अजुन थोडे दिवस – थोडे दिवस करून करून दिवसेंदिवस सर्व सामान्य व कर्जदार माणूस आर्थिकदृष्ट्या खुपच अडचणीत येत चालला आहे आत्ता त्याची आर्थीक क्षमता संपलेली आहे परिणामी तो माणसीक दृष्टीने लाॅकडावुन परत नकोच ह्या स्थितीत आला आहे. कोरोना म्हणजे यम. मग असा ही यम समोर दिसतच आहे मग घरात उपाशी मरण्या पेक्षा काम करता करता यमाशी लढू , त्यात एक कोणीही जिंकेल व एक हारेल. काय होईल ते होईल पण आत्ता परत लाॅकडावुन नकोच अशी परिस्थिती झाली आहे. सरकार सर्व सारासार विचार करून निर्णय घेईलच.