Bigg Boss Marathi : छोट्या पुढाऱ्याला नारळ बिग बॉसच्या घरातील खेळ संपला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ सप्टेंबर ।। बिग बॉस मराठीत (Bigg Boss Marathi) प्रत्येक दिवशी नवीन काही तरी रंजक पाहायला मिळते . प्रेक्षकही याची बिग बॉस मराठीची रात्री आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक आठवडा हा खास असतो. हा संपूर्ण आठवडा पुन्हा एकदा निक्कीने गाजवला आहे. या आठवड्यात कोणाला बिग बॉस घराला टाटा बाय बाय कराव लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या आठवड्यात छोट्या पुढारीने बिग बॉस घराचा निरोप घेतला आहे. बिग बॉस मराठी ५ च्या घरातून या आठवड्यात घन:श्याम दरवडे एलिमिनेट (Ghanshyam Darode Eliminated) झाला आहे. त्याचा बिग बॉसचा प्रवास संपला.

कमी वोट मिळाल्यामुळे घन:श्याम दरवडे याचा हा प्रवास येथेच थांबला आहे.बिग बॉसच्या घरात या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले होते यात निक्की तांबोळी, घन:श्याम दरवडे,अरबाज पटेल, सूरज चव्हाण, धनंजय पोवार,आर्या जाधव, अभिजित सावंत इत्यादी सदस्यांचा समावेश होता. या नॉमिनेशन प्रक्रियेत प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळे आर्या, धनंजय, अभिजित आणि सुरज चव्हाण हे सर्व सदस्य सुरक्षित झाले आहेत.

आज भाऊच्या धक्क्यावर मोठ्या घडामोडी होणार आहेत. या आठवड्यात सूरज चव्हाण कॅप्टन पदी विराजमान झाला आहे. त्यामुळे रितेश देशमुखने त्याचे कौतुक केले आहे. तसेच ‘कॅप्टनची योग्य जबाबदारी ओळखून भूमिका बजावा’ असा सल्लाही दिला आहे.

https://www.instagram.com/colorsmarathi/?utm_source=ig_embed&ig_rid=59e8a970-4ffc-4a33-8bbe-7736c04e0df1

आपल्या बोलण्याने घन:श्यामने बिग बॉस घरात स्वतःची वेगळी जागा तयार केली होती. बिग बॉसचे घर सोडताना छोटा पुढारी खूप भावूक झाला. निरोप घेताना तो म्हणाला की, खेळामध्ये असे होत राहते. खेळ जरी हरलो असलो तर घरात एक चांगली माणसे जोडली आहेत. तसेच चांगलं जगण्याचा प्रयत्न केला आहे. इथे डोक्याने गेम चालतो मात्र मी मनाने गेम खेळलो आहे. अस घन:श्याम बोलला. आपली मतं रोखठोक मांडणाऱ्या छोटा पुढारीने बिग बॉस मराठीचा निरोप घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *