महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ सप्टेंबर ।। बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये दरदिवशी नवीन टास्क आणि राडे बघायला मिळतात. बिग बॉसमध्ये या आठवड्यात गणपती स्पेशल भाऊचा धक्का सुरु आहे. काल बिग बॉसच्या घरातून घनःश्याम दरवडेची exit झाली. अशातच आज बिग बॉसमध्ये या सीझनमधील पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला आहे. या वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा प्रोमो रिलीज झाला असून प्रेक्षकांनी घरात कोण जाणार याबद्दल अचूक अंदाज लावलेला दिसतोय.
हा स्पर्धक बिग बॉसमधील पहिला वाइल्ड कार्ड?
‘तेरा बाप आया’ या गाण्यावर पिळदार शरीरयष्टीचा एक स्पर्धक बिग बॉसच्या घरात राडा घालायला सज्ज आहे. त्याविषयीचा प्रोमो रिलीज झाला आहे. दिलदार, मनाचा राजा आणि रांगडा गडी असं वर्णन करत या प्रोमोत वाइल्ड कार्ड स्पर्धक पाठमोरा दिसतोय. प्रेक्षकांनी कमेंट करुन हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून तो संग्राम चौगुले आहे, हे ओळखलंय. इतकंच नव्हे तर संग्राम चौगुलेची पत्नी स्नेहल यांनी हा प्रोमो शेअर केला असून संग्राम घरात जाणार यावर शिक्कामोर्तब केलंय.