महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ सप्टेंबर ।। आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात व्हॅाट्सॲप, इंस्टाग्राम खूप महत्त्वाचे आहे. सर्वच युजर्स व्हॉट्सॲपचा जास्तीतजास्त वापर करत असतात. व्हॉट्सॲपमुळे सर्वच आपल्या जवळच्या व्यक्तींशी चॅट करत असतात. याच युजर्ससाठी व्हॉट्सॲप नवनवीन फीचर्स , अपडेट घेऊन येत आहे. ज्यामुळे युजर्सनां त्याचा फायदा होतो. या फीचर्समुळे काम सिंपल होते. यासाठी व्हॉट्सॲप कंपनीने मॅक प्रोडक्टबाबत काही निर्णय घेतले आहे. ज्यामध्ये त्यांनी डेस्कटॅाप ॲप , मॅकचे इलेक्ट्रॉन बेस्ट आणि नवीन नेटिव्ह ॲप – कॅटलिस्ट बदलण्याचे सांगितले आहे. त्यांनी मॅकचे हे सर्व ॲप नवीन रुपात अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वाची माहिती WABetaInfoच्या रिपोर्टने दिली आहे.
व्हॉट्सॲप कंपनीने या सगळ्या नवीन अपडेटची माहिती युझर्सनां नोटिफिकेशन्सद्वारे दिली आहे. ज्यामुळे नोटिफिकेशन्स त्वरित दिसतील. WABetaInfoच्या मदतीने सांगितले की ५४ दिवस जुने ॲप काम करणार नसल्यामुळे त्या ॲप्सना बंद ठेवण्यात येईल. युजर्सना WABetaInfoच्या साहाय्याने X वर स्क्रीनशॅाट शेअर केला आहे. ज्यामध्ये कंपनीचे मॅकवरील इलेक्ट्रॅानिक ॲप बंद राहतील. या सर्व कारणांमुळे युजर्सनां ह्या गोष्टीची माहिती सूचित केली आहे.
मॅक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवरील व्हॉट्सॲप वापरण्यासाठी युजर्सनां खूप गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ज्यामध्ये त्यांना मॅक डेस्कटॅापवरचं नवीन व्हॉट्सॲप वापरावं लागेल. वापर करणाऱ्या युजर्ससाठी नवीन कॅटलिस्ट ॲप स्विच सुरु केलं जाईल. स्विच केलेल्या नवीन ॲपमध्ये युजर्सचा कॉन्टॅक्ट लिस्ट आणि चॅटचा डाटा सेव्ह करण्यात येईल. हा इलेक्ट्रॉनिक ॲप सिंगल ऑपरेटिंग सीस्टमवर काम करणारा आहे. ज्याने आपण एखादा ॲप सहजपणे तयार करु शकतो.
नवीन अपडेटमुळे कंपनी युजर्सनां Mac OS चे नवीन फीचर्स बघण्याचे आश्वासन देत आहे. ज्यामुळे युजर्सनां खूप फायदा होणार आहे. कॅटॅलिस्ट ॲपद्वारे वापर करणाऱ्या युजर्सनां सुरक्षा दिली जाणार आहे. माहितीनुसार , ऑक्टोबरच्या अखेरिस हा इलेक्ट्रॉनिक फ्रेमवर्क असणारा ॲप बंद केला जाईल. ज्यामुळे युजर्सनां व्हॉट्सॲप वेबसाईट वापरावी लागेल. त्या वेबसाईटवरुन वापर करते मॅक कॅटॅसिल्ट डेस्कटॉप ॲप डाउनलोड करु शकता.