‘तू आतापर्यंत फक्त…’ संग्राम चौगुलेने बिग बॉसमध्ये येताच अरबाजला दिली धमकी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ सप्टेंबर ।। बिग बॉस मराठीच्या नवीन घरात प्रत्येक दिवशी नवीन राडे, भांडणं, वादावादी बघायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीमध्ये काल गणेशोत्सव सेलिब्रेशन झालं. याशिवाय शनिवारी घनःश्याम दरवडे अर्थात छोटा पुढारी घराबाहेर गेलाय. अशातच काल बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पहिल्या वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली. तो म्हणजे संग्राम चौगुले. संग्रामने आल्या आल्या अरबाजवर शाब्दिक वार केलेला दिसला.

संग्रामची अरबाजला धमकी?
बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये संग्रामची एन्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, म्हणत संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात प्रवेश करतो. संग्राम येताच धनंजय पोवार, जान्हवी, आर्या अशा सर्वांना आनंद होते. अशातच संग्राम अरबाजकडे निशाणा साधत म्हणतो की, “तू आतापर्यंत तुझी maximum पॉवर दाखवली आहेस ती वीक माणसाला” अरबाजला हे पटत नाही. अशाप्रकारे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होते.

https://www.instagram.com/colorsmarathi/?utm_source=ig_embed&ig_rid=46755bdb-5681-43aa-b41c-e55aa9c5ce9d

कोण आहे संग्राम चौगुले?
संग्राम चौगुलेने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला असून भरपूर पुरस्कार, मेडल मिळवले आहेत. तो एक व्यावसायिक सुद्धा आहे. त्याने ८५ किलो गटात मिस्टर युनिव्हर्स २०१२ चा किताब पटकावला असून सहा वेळा मिस्टर इंडिया तर पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राचा किताब मिळवला आहे. संग्राम एका आलिशान जिमचा मालकही आहे. संग्राम बिग बॉसच्या घरात गेल्यावर काय राडा करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. संग्राम घरातील स्ट्रॉंग प्लेयर अरबाज, निक्कीला कशी टक्कर देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *