महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे वास्तू शास्त्राला देखील महत्त्व दिलं जातं. वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, असं म्हटलं जातं. घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण रहावं यासाठी अनेक जण वास्तूशास्त्राची मदत घेण्यात येते. वास्तू शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तूला एक ठराविक जागा असून गोष्टी त्याच ठिकाणी ठेवल्याने घरातील दुःख कमी होऊ शकतात.
वास्तू तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, घरातील तीन गोष्टी अशा आहेत ज्या घरात कधीही रिकाम्या ठेवू नयेत. असं म्हटलं जातं की, घरातील या गोष्टी रिकाम्या असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. याचसोबत घरामध्ये गरीबी येण्याची धोका असतो. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या घरामध्ये रिकामी ठेऊ नयेत.
पाण्याचं भांडं
वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये पाण्याचं भांडं कधीही रिकामी ठेऊ नये. असं म्हटलं जातं कीस पाण्याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे जर तुम्ही राहत्या घरात पाण्याचं भांडं रिकामी ठेवत असाल तर लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिकामी पाण्याचं भांडं कधीही घरी ठेऊ नये.
पर्स किंवा तिजोरी
वास्तू शास्त्रानुसार, तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी असू नये. यामुळे गरीबी कधीही तुमची पाठ सोडत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्समध्ये नेहमी काही पैसे ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय तुमच्या घरातील तिजोरीही नेहमी भरलेली असली पाहिजे. यामुळे घरावर येणारं आर्थिक संकट टळलं जातं.
धान्य
वास्तू शास्त्रानुसार, किचनमध्ये असणारे धान्याची भांडी कधीही रिकामी असू नयेत. यामुळे घरात गरीबी येण्याचा धोका असतो. खासकरून तांदूळ आणि डाळ यांची भांडी चुकूनही रिकामी ठेऊ नयेत. हे संकेत अशुभ मानले जातात.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )