महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। वडगाव मावळ येथील मानाच्या गणेशोत्सव मंडळांना भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी कार्यकर्त्यांसह भेटी देऊन , गणरायाची आरती केली आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
तत्पूर्वी त्यांनी वडगाव शहर मधील श्री पोटोबा महाराज देवस्थानचे दर्शन घेतले. जय जवान जय किसान तरुण मंडळ, नवचैतन्य तरुण मंडळ या मंडळांना भेटी दिल्या.
याप्रसंगी ; भाजपा प्रभारी भास्कराव म्हाळसकर,मा,उपसभापती गुलाबकाका म्हाळसकर, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष संभाजी म्हाळसकर,भाजपा कोशाध्यक्ष सुधाकर ढोरे,मा.अध्यक्ष अनंता कुडे,मा.नगरसेवक प्रसाद पिंगळे,मा.नगरसेवक रविंद्र काकडे,वडगाव शहर भाजपा सरचिटणीस मकरंद बवरे,मा.नगरसेवक रविंद्र म्हाळसकर,पोटोबा देवस्थान अध्यक्ष किरण भिलारे,नगरसेवक किरण म्हाळसकर,मा.नगरसेवक शंकर भोंडवे,रमेश ढोरे,सागर म्हाळसकर,अतुल म्हाळसकर,विकिभाऊ म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.