महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – , 22 जुलै : गेले दहा ते बारा दिवस राज्यातून पाऊस गायब आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सध्या पावसाचा जोर हिमालय पायथा ते बिहार पर्यत आहे.त्यापुढे मध्य प्रदेश,गजरात व महाराष्ट्रात पाऊस नव्हता. पण 20 जुलै पासून मान्सून अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने सक्रीय झाला आहे. तसेच उत्तर भारतातून तो मध्य प्रदेश मार्गे विदर्भातही काही प्रमाणात येत आहे.आषाढ महिन्यात राज्यावर रुसलेला पाऊस श्रावणात परत येतोय. मराठवाडा ते कर्नाटक,केरळ पर्यत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.शिवाय अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने तिकडून वारे वेगवान झाले आहे.या पोषक वातावरणामुळे राज्यात 22 जुलै पासून पावसाला सुरुवात होत आहे.23 ते 25 हे तीन दिवस राज्यातील बारा जिल्हयात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
सोमवारी रात्री मराठवाडा ते कर्नाटक व केरळ पर्यत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. वार्याचा वेगही ताशी 50 ते 60 किमी इतका वाढला आणि हवेतील अर्दताही वाढल्याने पावसाचे संकेत मिळाले. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यातच 22 ते 25 या कालावधित मुसळधार पाऊस पडेल.23 ते 25 हे तीन दिवस काही भागात पावसाचा मोठा जोर राहिल.
या बारा जिलह्यात पावसाचे संकेत..पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी लातूर या अकरा जिल्ह्यातच 23 ते 25 जुलै या कालावधित पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
घाट माथ्यावर जोरदार पाऊसपुणे शहरात पाऊस नसला तरी घाट माथा भागात 23 ते 25 रुलै या कालावधित जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तो पाऊस पुणे शहरा पर्यत येईल पण शहरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहिल.
राज्यात 20 जुलै पासून मान्सून सक्रीय झाला आहे.आर्द्रता वाढत आहे.त्यामुळे 22 जुलै पासून पाऊस पडेल पण मुसळधारेचा अंदाज 23 ते 25 असा आहे.या तीन दिवसात राज्यात सर्वच भागात मोठा पाऊस पडेल असा अंदाज आहे.पुणे घाट माथ्यावर हे तीन दिवस मोठा पाऊस आहे.शहरात कमी असला तरी घाट मथ्यावर पडणार्या पावसाचा फायदा पुणे शहराला होणार आहे.
-अनुपम कश्यपि, हवामान विभाग प्रमुख,पुणे