![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना या महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. काही योजना लहान मुलांसाठी, गरोदर महिलांसाठीदेखील राबवण्यात आल्या आहे. फक्त केंद्र सरकार नाही तर विविध राज्यात नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री बाल सेवा योजना.
मुख्यमंत्री बाल सेवा योजना
मुख्यमंत्री बाल सेवा योजना ही उत्तर प्रदेश सरकारने राबवली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत लहान मुलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत लहान मुलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. ही मदत लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि पोषणासाठी दिली जाते. निराधार मुलांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक मुलांना दर महिन्याला पैसे देण्यात आले आहेत.
पात्रता
मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत निराधार मुलांना आर्थिक मदत केली जाते. जी मुले अनाथ आहेत ज्यांच्या आईवडिलांच्या निधन झाले आहेत अशा मुलांना सरकार मदत करते. ही अनुदानाची रक्कम मुलांच्या बँक खात्यात पाठवली जाते. दर तीन महिन्यांनी मुलांच्या खात्यावर हे पैसे पाठवले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. फक्त शाळेत शिकणाऱ्या मुलांना या योजनेचा लाभ मिळतो. शाळेचे कार्ड दाखवून तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकतात.![]()
