Mhada Lottery : म्हाडाच्या घरांची लॉटरी या तारखेला ; उत्पन्न गटानुसार कमी झाल्या किमती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। म्हाडाने १ हजार ३० घरांची लॉटरी काढली आहे. यासाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती मिळतेय. तर रात्री ११.९९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा देखील करता देणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजत नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लॉटरी काढण्यात येणार आहे.

या लॉटरीमध्ये ३७० घरांच्या किमती १० ते २५ टक्के कमी झाल्याची माहिती मिळतेय. किमती कमी झाल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला ९ ऑगस्ट रोजी सुरूवात झाली होती. १९ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत (Mhada house lottery on October) दिलेली आहे.

म्हाडाच्या घरांची लॉटरी
२९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन यावे, हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत मुदत आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी (Mhada house lottery) ६ वाजेपर्यंत लॉटरीसाठी स्वीकृत अर्जासाठी असलेली अंतिम यादी म्हाडाच्या https://housing, mhada. प्रसिद्ध होणार आहे. लॉटरी आल्यानंतर सोडतीमधील यशस्वी आणि प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची नावे वेबसाइटवर प्रसिद्ध केली जातील.

उत्पन्न गटानुसार कमी झाल्या किमती
अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८, उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरे असल्याची माहिती (Mhada Lottery) मिळत आहे. हाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास आणि प्राधिकरणाने परवडणाऱ्या घरांच्या किमती १० ते २५ टक्क्यापर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण (Mhada Lottery Date) आहे. बहुसंख्य अर्जदारांचे लक्ष किंमत कमी झालेल्या घरांकडे लागलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *