महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। प्रत्येकजण आपल्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सरक्षित व्हावे यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवली आहेत.या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यावर मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते. या योजनेबाबत नवीन नियम लागू होणार आहेत. या योजनेअंतर्गत मुली लहान असल्यापासून गुंतवणूक करायची असते. मुलींचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर त्यांना हे पैसे मिळतात.
सुकन्या समृद्धी योजनेबाबत नवीन नियम लागू होणार आहे. १ ऑक्टोबरपासून हे नवीन नियम लागू करण्यात येणार आहे.सुकन्या योजनेतीतील राष्ट्रीय योजनेअंतर्गत मार्गदर्शक तत्वे जारी करण्याती आली आहे. या योजनेअंतर्गत एखाद्या मुलीचे खाते जर तिच्या आजी आजोबांनी उघडले असेल तर ते अपडेट करणे गरजेचे आहे.
सुकन्या समृद्धीचे खाते पालकांच्या नावावर ट्रान्सफर करावे लागेल
सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या नावावरील खाते गे त्यांच्या पालकांनीच उघडलेले असावे. अनेकदा मुलींच्या आजी आजोबांनी हे खाते उघडलेले असतात. परंतु आता हे खाते तुम्हाला ट्रान्सफर करावे लागेल. योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, केवळ पालक आणि कायदेशीर पालक खाते उघडू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आजी आजोबांनी उघडलेले खाते पालकांच्या नावावर ट्रान्सफर करावे लागेल. पासबुक, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, कायदेशीर पालक असल्याचा दाखला, ओळख प्रमाणपत्र, जुन्या खातेधारकांचे प्रमाणपत्र आणि नवीन खातेधारकांचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.