Kidney Damage: किडनी निकामी होण्यापूर्वी शरीरात दिसतात हे बदल; साधारण समजून दुर्लक्ष करू नका!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१५ सप्टेंबर ।। आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. यामधील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी आपल्या शरीरातून टॉक्सिन आणि घाण पदार्थ दूर करण्यात मदत करते. मात्र जर किडनीच्या कार्यात थोडा जरी बिघाड झाला तर त्याचा परिणाम सर्व शरीरावर दिसून येतो. त्यामुळे किडनीचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे.

लाईफस्टाईलमुळे समस्यांमध्ये वाढ
मात्र आजकाल तरूणांची जीवनशैली बदलली आहे. या चुकीच्या जीवनशैलीमुळे किडनीसंबंधीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. किडनीची कोणतीही समस्या जाणवत असेल तर त्याची लक्षणं दिसून येतात. जर तुम्ही वेळीच ही लक्षणं ओळखली तर त्या समस्येवर उपचार करणं फायदेशीर आहे.

किडनीच्या समस्या उद्भवल्या की आपल्या पायामध्ये काहीसे बदल दिसून येतात. जर तुमच्याही पायात हे बदल तुम्हाला दिसत असतील तर वेळीच सावध व्हा. जाणून घेऊया हे बदल कोणते आहेत.

पायांमध्ये सूज येणं
किडनीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यात तर पाय आणि घोट्याला सूज येऊ लागते. जेव्हा किडनीचं कार्य ज्यावेळी बिघडतं तेव्हा शरीरात एक द्रव पदार्थ साचू लागतो. त्यामुळे पाय आणि घोट्याला सूज येण्याचा धोका असतो. वैद्यकीय भाषेत याला एडेमा असं म्हणतात. कोणत्याही उघड कारणाशिवाय तुम्हालाही तुमच्या पायात सूज आल्याचं दिसून आलं तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

पाय सुन्न पडणं
अनेकदा आपल्याला पाय थंड पडणं किंवा सुन्न होणं असा त्रास जाणवतो. मात्र तुम्हाला माहिती नसेल, पण हे किडनी निकामी होण्याचं लक्षण असू शकतं. किडनी निकामी झाल्यामुळे, रक्त प्रवाह कमी होऊ शकतो, ज्यामुळे पाय थंड किंवा सुन्न होऊ शकतात. जर सातत्याने तुमचे पाय थंड पडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

पायांमध्ये वेदना होणं
पाय दुखणं किंवा पायांमध्ये क्रॅम्प्स येणं हे देखील किडनीच्या समस्येचं लक्षणं मानलं जातं. किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकतं. त्यामुळे पायांमध्ये वेदना जाणवतात. अशावेळी व्यक्तीला चालण्यास देखील त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला जर पायांमध्ये हे बदल जाणवले तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *