सोनं चांदी खरेदी करावं की नको? सोने चांदीच्या किमतीत इतक्या रुपयांची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१५ सप्टेंबर ।। Gold and Silver Price News : गेल्या महिनाभरापूर्वी सोन्या चांदीच्या भावात (Gold Price) कपात झाली होती. मात्र अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजाचे दर यामुळं दोनच दिवसात चांदीच्या भावात (Silver Price) प्रतिकीलो जवळपास 7 हजारांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावातही (Gold Price) प्रति तोळा 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते गेल्या 1991 नंतर म्हणजे साडे तीन दशकांत अत्यंत कमी कालावधीत म्हणजे दोन दिवसात ही सर्वात मोठी वाढ आहे.

संपूर्ण देशात खामगाव येथील चांदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. आता खामगाव येथील बाजारपेठेत चांदी 91000 रू प्रति किलो तर सोने 75200 रू प्रति तोळे मिळत आहे. मात्र ही दरवाढ दिवाळी पर्यंत स्थिरावेल अशी माहिती चांदीच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.

काल चांदीच्या दरात 4400 रुपयांची वाढ झाली होती
काल (13 सप्टेंबर) चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काल एकाच दिवसात बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या दरात (Silver Price) तब्बल 4400 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ
एका बाजूला राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काळात आमकी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मौल्यवान धातूंच्या (सोने आणि चांदी) किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते, त्याचा फायदा सराफांना होऊ शकतो. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *