September Travel Plans: सप्टेंबर स्पेशल खास ट्रॅव्हल्स प्लॅन; या ठिकाणी तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आंनद लुटता येईल.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ सप्टेंबर ।। प्रत्येकाला शांतता हवी असते. हल्ली सगळेच काम, धावपळ, प्रवास यात व्यस्थ झाले आहे. मग ऑफिस, काम, घर या कंटाळवाण्या आयुष्यातून काहीतरी वेगळं पाहिजेच ना! तुम्ही भारतात अनेक वर्ष राहत आहात. भारत हा नैसर्गिक घटकांनी सजलेला देश आहे. आपल्याकडे २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. मग आपण नेमकं कूठे कूठे फिरायचं? हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. असाच भारतात फिरण्याचा जर प्लॅन करत असाल तर पुढची काही ठिकाणं तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरेल.

ऋषिकेश
तुम्ही तुमचा जोतिष शास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही ‘ऋषिकेश’ या ठिकाणाला भेट देऊ शकता. आपल्या कुटुंबासोबत तुम्ही गंगा आरतीत सहभागी होवू शकता.

जयपूर
राजस्थानमध्ये वसलेल्या जयपूर शहरात तुम्ही पर्यटनासाठी जावू शकता. जयपूरमध्ये अनेक प्रकारचे कॅफे आहेत. तुम्ही मित्रमंडळींसोबत या ठिकाणचे वातावरण अनुभवू शकता.

कोलकाता
एक ऐतिहासिक शहर म्हटलं की, कोलकता पहिल्याच क्रमांकावर येत. हे शहर ब्रिटीश राजवटीतले शहर होते. तिथे गेल्यावर आपण एका वेगळ्याच युगात गेलोय हा फील नक्कीच अनुभवता येईल.

वाराणसी
गंगेच्या काठावर वसलेले हे वाराणसी शहर आहे. हे प्राचीन काळातले एक अध्यात्मिक शहर म्हणून नावाजलेले आहे. हिंदू धर्मातल्या लोकांसाठी वाराणसी शहर तिर्थक्षेत्रच आहे.

सिक्कीम
पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण म्हणजे सिक्कीम. तिथले पर्वत नेहमीच पर्यटकांना भूरळ घालतात. तिथे तुम्ही हिमालय ट्रेकिंगचा देखील आनंद घेवू शकता.हे शहर हिल स्टेशन म्हणून सुद्धा ओळखले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *