जोपर्यंत शाळा बंद आहेत, तोपर्यंत फी नाही; या सरकारचा पालकांना दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अहमदाबाद – ता. २३ जुलै – : देशातील कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. दररोज कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात सरकारने मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेची फी भरण्यासंदर्भात दिलासा दिला आहे.

गुजरात सरकारने अधिसूचना जारी करुन पालकांना दिलासा दिला आहे. गुजरात सरकारच्या अधिसूचनेनुसार शाळा सुरू होईपर्यंत शाळा पालकांकडून फी घेऊ शकत नाहीत. तसेच, शाळांकडून फीसाठी विद्यार्थी किंवा पालकांवर दबाव आणल्यास जिल्हा शिक्षणाधिऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले आहे.

अधिसूचनेत असे म्हटले आहे की, ज्या पालकांनी विद्यार्थ्यांची शालेय फी जमा केली आहे, त्यांची शाळा उघडल्यानंतर फी परत द्यावी किंवा पुढील महिन्यात त्यांचा विचार केला जाईल. मात्र, गुजरात सरकारच्या या निर्णयाला राज्यातील खासगी शाळांनी विरोध दर्शविला आहे. गुजरातच्या खासगी स्कूल बोर्डाने आत्तापासून ऑनलाईन क्लास घेण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सध्या शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत शाळा सुरू न करताही अनेक शाळा पालकांकडून फी आकारत होत्या. याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. जनहित याचिकेनंतर गुजरात उच्च न्यायालयाला गुजरात सरकारने आदेश दिले. त्यानंतर गुजरात सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *