महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ सप्टेंबर ।। उद्यापासून म्हणजेच १९ सप्टेंबर पासून भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये २ सामन्यांच्या टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. या सिरीजपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची प्रेस कॉन्फ्रन्स झाली. यावेळी रोहितने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत येणाऱ्या काळात टीम इंडियातील टॉप खेळाडू कोण असणार आहे, यावर रोहितने त्याचं मत दिलंय.
या ३ खेळाडूंचं रोहितने घेतलं नाव
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्रामुख्याने यावेळी ३ खेळाडूंचं नाव घेतलं. यामध्ये यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना आगमी काळात सर्व फॉर्मेटमध्ये संधी देण्याची आशा त्याने व्यक्त केली. रोहित नेमकं यांच्याविषयी काय म्हणालाय ते पाहूयात.
रोहित शर्मा म्हणाला की, खरं सांगायचं तर त्यांच्याशी जास्त बोलण्याची गरज नाहीये. ते टेस्ट क्रिकेटमध्ये नवे आहेत. आपण सर्वांनी पाहिलंय हे खेळाडू फलंदाजीमध्ये काय करू शकतात. खासकरून विकेटकीपिंगरमध्ये ध्रुव जुरेल. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे टॉप खेळाडू होण्यासाठी त्यांच्याकडे सर्व काही आहे.
इंग्लंड विरूद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात जुरेलने भारतासाठी पहिली कॅप मिळवली होती. यावेळी पहिल्या टेस्ट सामन्यात या विकेटकीपर फलंदाजाने 46 रन्सची शानदार खेळी केली. यानंतर चौथ्या टेस्टमघ्ये त्याने पहिल्या डावात 90 (149) रन्सची उत्तम खेळी करत भारताची धावसंख्या 307 पर्यंत नेली होती.
दुसरीकडे सरफराजने टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील एक मजबूत खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने तीन सामन्यांत 50.00 च्या सरासरीने 200 रन्स केलेत. युवा तर ओपनर जयस्वालने 89.00 च्या प्रभावी सरासरीने 712 रन्स करून आघाडीचा रन्स करणारा म्हणून सिरीज संपवली होती.
काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित पुढे म्हणाला की, “अखेरीस जेव्हा तुम्ही असा खेळ करता तेव्हा तुम्ही तुमच्या मनात काय विचार करता यावर हे सर्व अवलंबून असते. मला वाटतं की, या खेळाडूंना याबाबत स्पष्टता आहे. भारतासाठी क्रिकेट खेळायची त्यांना भूक आहे.
पहिल्या टेस्ट सामन्यासाठी कशी आहे टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.