महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। Bajaj Most Valued Finance Group: बजाज समूह हा देशातील तिसरा सर्वात मोठा मूल्यवान समूह बनला आहे. बजाजने SBI समूहाला मागे टाकले आहे. बजाज समूहाच्या चार लिस्ट वित्तीय कंपन्या बजाज होल्डिंग्ज, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि आता लिस्ट झालेली बजाज हाउसिंग फायनान्सचे मार्केट कॅप 10.36 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसचे एकत्रित मार्केट कॅप 9.6 लाख कोटी रुपयांवर आले आहे. मात्र, मालमत्तेच्या बाबतीत बजाज समूह इतर आर्थिक समूहांपेक्षा खूपच मागे आहे.
15.75 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह HDFC समूह हा देशातील सर्वात मोठा आर्थिक समूह आहे. ICIC समूह 11.95 लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ICICI समुहाकडे चार लिस्टेड कंपन्या आहेत.
यामध्ये ICICI बँक, ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स आणि ICICI सिक्युरिटीज यांचा समावेश आहे. या यादीत 3.85 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह ॲक्सिस बँक पाचव्या स्थानावर आहे आणि कोटक महिंद्रा बँक 3.79 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह सहाव्या स्थानावर आहे.
पहिल्या क्रमांकावर कोण आहे?
मालमत्तेच्या बाबतीत, एसबीआय 64.29 लाख कोटी रुपयांसह अव्वल आहे. ICICI बँक 41.56 लाख कोटींसह दुसऱ्या, एचडीएफसी समूह (38.55 लाख कोटी) तिसऱ्या, ॲक्सिस बँक (14.53 लाख कोटी) चौथ्या, कोटक महिंद्रा बँक (7.24 लाख कोटी) पाचव्या आणि बजाज समूह (3.93 लाख कोटी) सहाव्या स्थानावर आहे.
निव्वळ नफ्याच्या बाबतीतही एसबीआय 67,103 कोटी रुपयांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर HDFC बँक ( 63,899 कोटी), ICICI समूह ( 44,246 कोटी) तिसऱ्या, ॲक्सिस बँक ( 26,386 कोटी) चौथ्या क्रमांकावर, कोटक महिंद्रा बँक ( 18,213 कोटी) पाचव्या आणि बजाज समूह ( 15,415 कोटी) सहाव्या क्रमांकावर आहे.