महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळ्या झाडात आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. मात्र आता एक नवीन माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याने आत्महत्या केली नसून पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा शिंदे याला पोलीस कोठडीत घेऊन जाण्यात येत होते.. त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर तळोजा कारागृहातून नेत असताना त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. याशिवाय आरोपी शिंदे याने आणखी दोन गोळ्या झाडल्या ज्या कोणालाही लागल्या नाहीत. यानंतर दुसऱ्या एका पोलिसाने स्वसंरक्षणार्थ बंदूक काढून अक्षय शिंदेवर गोळीबार केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
अक्षयचा एन्काऊंटर संशयास्पद
अक्षयचा एन्काऊंटर संशयास्पद असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ म्हणाले आहेत. संजय शिरसाठ म्हणाले आहेत की, ”ही घटना मला पटत नाही आहे. एखाद्या आरोपाला घेऊन जाताना चार तरी पोलीस कर्मचारी सोबत असतात. तो इतका मोठा पैलवान नव्हता की, पोलिसांची बंदूक हसवून घेऊन गोळीबार करेल. कोणाकडून तरी हलगर्जीपणा झाला असेल.”