महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ सप्टेंबर ।। सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्ती लॅपटॉप आणि कंप्युटरवर काम करतात. स्क्रिनवर असलेली लाइट आपल्या डोळ्यांची दृष्टी कमी करते. दृष्टी पुसट झाली की आपल्याला समोरचं सर्वकाही अंधुक दिसू लागतं. तसेच डोळ्यांवर ताण आणखी जास्त वाढत जातो. आता तुमचे डोळे देखील सतत दुखत असतील आणि त्यामुळे डोकं देखील दुखत असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.
डोळ्यांची उघडझाप करा
काम करताना आपलं पूर्ण लक्ष स्क्रिनवर असतं. त्यामुळे डोळे दुखू लागतात. असे होत असल्यास अधुनमधून २० सेकंदाचा ब्रेक घ्या. ब्रेक घेतल्यावर डोळ्यांची उघडझाप करत राहा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि डोळे दुखणे कमी होतं.
२० सेकंदाचा ब्रेक
डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कामामध्ये प्रत्येक १ किंवा आर्ध्या तासाने २० सेकंदांचा ब्रेक घ्या. ब्रेक घेतल्याने डोळ्यांची एक्सरसाइज करा. तसेच स्क्रिन न पाहता अन्य काही वस्तू पाहत राहा. यामध्ये तुम्ही डेस्कवर एक झाड ठेवा आणि त्याकडे पाहत राहा. असे केल्याने डोळ्यांचा त्रास कमी होईल.
हाताने डोळ्यावर मसाज करा
जेव्हा तुमचे डोळे दुखण्यास सुरुवात होईल त्यावेळी डोळ्यांना हाताने मसाज करा. हाताची बोटे डोळ्यांवर फिरवून घ्या. तसेच कपाळावर देखील बोटांनी मसाज करा. असे केल्याने देखील तुम्हाला होणारा त्रास मोठ्याप्रमाणात कमी होईल.
डोळे चारही बाजून फिरवा
काम करताना एक तासानंतर डोळे चारही बाजून फिरवा. डोळे फिरवताना आधी डोळे बंद करा आणि मग सर्वत्र फिरवा. ही ट्रिक तुम्हाला १० वेळा फॉलो करायची आहे. यामुळे हळू हळू तुमच्या डोळ्यांवरील चष्मा गायब होईल.