आरक्षण मिळाल्यावर दिलेल्या त्रासाचा हिशोब करू : मनोज जरांगे पाटील

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जानेवारी ।। काल पुण्याहून रवाना झालेला मराठा मोर्चा आज सकाळी लोणावळ्यात दाखल झाला आहे. येत्या 24 तासात हे भगव वादळ मुंबईमध्ये जाऊन धडकणार आहे. बीडपासून निघालेल्या आंदोलनात ठिकठिकाणाहून मराठा समाजबांधव सामील झाले आहेत. लोणावळ्यातही जरांगे पाटलांच जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना जरांगे म्हणतात, ‘ २६ तारखेला मराठा समाज मुंबईकड येणार. मी आधीच सांगितलं होतं, मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे ते कुठंही दिलं तरी चालेल. मग लोणावळ्यात, नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल, असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. या दरम्यान त्यांनी मराठा आंदोलकांना काही सूचनाही केल्या. यावेळी ते म्हणतात,


आंदोलना दरम्यान शिस्त पाळा.
एकजूट महत्त्वाची आहे.
संपूर्ण कालावधीत मराठ्यांच्या विरोधात जाण्याची धमक कुणामध्ये उरली नाही पाहिजे
मी आरक्षण घेईनच. फक्त तुमची एकजूट दिसू द्या.
शांततेत आरक्षण घेणं हे सध्या महत्त्वाचं आहे.
कोणीही कायदा हातात घेऊ नका.
शेवटच्या माणसाला आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *