फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी ; पाहा BSNLचा नवा प्लॅन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑक्टोबर ।। जुलैमध्ये अनेक खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत १५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर जिओ, एअरटेल, व्हीआयच्या ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम झाला. अशा तऱ्हेनं अनेकांनी आपलं लक्ष सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळवलं होतं. गेल्या काही महिन्यांत बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्याही वाढली आहे. बीएसएनएल आपल्या बाजूने अधिक ग्राहक जोडण्यासाठी नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. हा रिचार्ज प्लान इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा खूपच स्वस्त आहे. दरम्यान, बीएसएनएलनं आणखी एक नवा प्लॅन आणला आहे.

९१ रुपयांचा रिचार्ज प्लान

बीएसएनएलच्या या ९१ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बीएसएनएलचा ९१ रुपयांचा हा रिचार्ज प्लान पूर्ण ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. इंडस्ट्रीतील इतर कोणत्याही कंपनीकडे एवढा स्वस्त प्लॅन नाही. या प्लानमध्ये युजर्सचे सिम ९० दिवस अॅक्टिव्ह राहतं. म्हणजेच हा प्लॅन फक्त व्हॅलिडिटी प्लॅन आहे. या प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग, इंटरनेट, एसएमएस सारख्या सुविधा मिळणार नाहीत.

बीएसएनएलचा ९१ रुपयांचा रिचार्ज प्लान दोन सिम वापरणाऱ्या युजर्ससाठी बेस्ट आहे. युजर्स आपला दुसरं सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा प्लॅन खरेदी करू शकतात. कॉलिंगची सुविधा मिळवण्यासाठी तुम्ही या प्लॅनसोबत टॉकटाइम व्हाउचर प्लॅन घेऊ शकता.

लवकरच सुरू होणार 4G सुविधा

बीएसएनएलही लवकरच आपली ४जी सेवा सुरू करणार आहे. बीएसएनएल फोरजी सेवेसाठी अतिशय वेगाने काम करत आहे. बीएसएनएलची फोरजी सेवा आल्यास बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या आणखी वाढू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *