महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑक्टोबर ।। देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे.नवरात्री नंतर दसरा, दिवाळी आणि धनत्रयोदशी असे मोठे सण अवघ्या दिवसांवर येऊन ठेपले आहे. या काळात लोक मोठ्याप्रमाणात सोनं-चांदी खरेदी करतात, पण या सणासुदीच्या काळाला सुरुवात होत नाही तोवर सोन्या-चांदीच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडल्याचे पाहायला मिळत आहे. प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर आज ७६ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. तर प्रति किलो चांदी ९३ हजार झाली आहे. यामुळे आता ग्राहकांना ऐन सणासुदीत सोनं-चांदी खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडला आहे. पण आज तुमच्या शहरात नेमके सोन्याचे दर काय आहेत जाणून घेऊ….
आज 5 ऑक्टोबर रोजी देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. मात्र हे दर स्थिर असले तरी यात झालेली वाढ ही खूप मोठी आहे, देशात आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच दर ७६,२५० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९३,५७० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात सतत १००० ते २००० रुपयांच्या दरम्यान चढ-उतार दिसून येत आहे, तर चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणं आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७६,२५० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६९, ८९६ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९३६ रुपये आहे तर १ किलो चांदी ९३,५७० रुपयांनी विकली जात आहे. आदल्या दिवशीचा म्हणजे ४ सप्टेंबर २०२४ रोजी देखील हेच दर होते.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,७६८
रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,११० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,११० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,११० रुपये आहे.
वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.