महायुती सरकारला गोरगरीब जनतेचे नक्की आशीर्वाद मिळणार….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑक्टोबर ।। महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला रमाई आवास योजनेत घरकुल बांधणे अनुदान चालू होते परंतु तुटपुंज्या अनुदानामुळे गोरगरिबांना घर बांधणे शक्य होत नव्हते, महाराष्ट्रभर बहुजन संवाद यात्रेच्या निमित्त ग्रामीण भागात फिरत असताना महाराष्ट्रातील खास करून ग्रामिग भागतील मागासवर्गीय जनतेची मागणी आमदार अमित गोरखे यांनी महायुती सरकारपर्यंत पोहोचवली होती व पाठपुरावा करून रमाई घरकुल आवास योजनेचा निधी मंत्रिमंडळ निर्णय करून ग्रामीण भागासाठी मान्य करून घेतला आहे.
याबद्दल आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र सरकारचे तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस,श्री अजित दादा पवार यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत..

रमाई आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी घर बांधण्यासाठी पूर्वी एक लाख वीस हजार एवढी रक्कम मिळायची आता त्यामध्ये वाढ होऊन दोन लाख पन्नास हजार एवढी रक्कम मिळणार आहे… त्याचबरोबर या व्यतिरिक्त शौचालय बांधण्यासाठी रुपये 12000 ही रक्कम वेगळी दिली जाणार आहे.

यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आपले घर बांधणे चांगल्या पद्धतीने शक्य होणार असून संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाचा स्वागत करण्यात येत आहे, असे आमदार अमित गोरखे म्हणाले या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने महायुती सरकार मागासवर्गीय ,कष्टकरी,गोरगरीब जनतेचे महत्त्वाचे प्रश्न सोडवताना आपल्याला दिसत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जनता महायुती सरकार सोबत नक्की राहील असे ते पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *