‘राफेल योद्धे’ झेपावले; उद्या भारतभूमीला स्पर्श करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ता. २८ जुलै – पॅरिस : भारताने फ्रान्सकडून घेतलेल्या अफाट मारकशक्तीच्या व अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज अशा पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी सोमवारी फ्रान्समधून भारताकडे रवाना झाली. दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून एकूण ३६ राफेल विमाने ५९ हजार कोटी रुपयांना घेण्याचा करार भारताने चार वर्षांपूर्वी केला होता व दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनची अडचण येऊनही कंपनीने त्यापैकी पहिल्या तुकडीतील विमाने ठरल्यावेळी सुपूर्द केली आहेत.

भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ यांनी ही विमाने घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांशी मेरीग्नॅक हवाईतळावर बातचीत करून त्यांना शुभेच्छापूर्वक निरोप दिला.

राजदूत अश्रफ यांनी या विमानांना निरोप देतानाचा एक व्हिडिओदेखिल भारताच्या फ्रान्समधील वकिलातीने प्रसिद्ध केला. त्यात विमाने घेऊन जाणाºया वैमानिकांना उद्देश्ून राजदूत म्हणाले की, आमच्या हवाईदलाने ही विमाने प्रत्यक्ष वापरून पाहिली आहेत व ती अत्यंत चपळ, अचूक,बहुपयोगी व घातक मारा करू शकणारी असल्याची पोंचपावती त्यांनी मिळविली आहे. ही सर्वोत्तम वैमानिकांकडून चालविली जाणारी सर्वोत्तम लढाऊ विमाने आहेत. थोडक्यात त्यांना तुम्ही ‘ब्युटी’ व ‘बीस्ट’असे दोन्हीही म्हणू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *