दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -पुणे – ता. २९ जुलै – दहावीच्या निकालाची प्रतिक्षा आता संपली असून बुधवारी, 29 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना वेबसाईटवर विषयनिहाय गुण दिसतील तसेच सदर माहितीची प्रिंटआऊट घेता येईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली. www.mahahsscboard.in या वेबसाईटवर शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल तसेच www.mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत इतर सांख्यिकी माहीती मिळेल.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी या वेबसाईटचाही वापर करता येईल

mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
maharashtraeducation.com
mahahsscboard.in

गुणपडताळणीसाठी 8 ऑगस्टपर्यंत, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी 18 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्जाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *