एलॉन मस्क यांच्या टेस्लाने आणली अचंबित करणारी ‘रोबोट टॅक्सी’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।। जगभरात प्रसिद्ध असलेले अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) हे तंत्रज्ञानस्नेही आहेत. ते बाजारात नवनवी उत्पादने घेऊन येतात. मंगळ या उपग्रहावर मानवी वस्ती वसविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांची स्पेस एक्स ही कंपनी त्या दृष्टीने काम करत आहे. एलॉन मस्क यांची कारनिर्मिती क्षेत्रात काम करणारी टेस्ला ही कंपनीदेखील संपूर्ण जागाला अंचबित करणाऱ्या कारनिर्मितीत गुंतलेली असते. दरम्यान, मस्क यांच्या याच टेस्ला कंपनीने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या एका अनेख्या कारची निर्मिती केली आहे. या कारला सायबरकॅब असं नाव दिलं.

सायबरकॅब आणि रोबोव्हॅनचे अनावरण
टेस्ला ही अमेरिकेतील ईव्ही कार निर्मिती करणारी दिग्गज कंपनी आहे. या कंपनीने नुकतेच सेल्फ ड्रायव्हिंग ड्रायव्हरलेस म्हणजेच कोणताडी चालक नसलेली कार सर्वांसमोर आणली आहे. या कारमध्ये कोणतेही स्टिअरिंग नाही. तसेच कोणत्याही ड्रायव्हरच्या मदतीविना ही कार रस्त्यावर धावू शकणार आहे. टेस्लाने या कारचे अनावरण कॅलिफोर्निया या शहरात केले आहे. ही एका प्रकारची रोबोट टॅक्सी आहे. सायबरकॅब या कारसह टेस्लाने एक रोबोव्हॅन नावाचे ईव्ही व्हॅनही लॉन्च केली आहे.

रोव्होव्हॅनमध्ये नेमकं काय असणार?
टेस्लाने समोर आणलेली रोबोव्हॅन आणि सायबरकॅब ही कार बॅटरीवर चालते. या कारमध्ये अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स- AI ) वापर करण्यात आला आहे. याच एआयमुळे कार चालवताना ड्रायव्हरची गरज भासणार नाही. या कारमध्ये कोणतेही स्टिअरिंग हातात न घेता, आरामात बसता येणार आहे. तुम्ही आरामत बसून कारमध्ये कोणतेही काम करू शकता, तुम्ही दिलेल्या कमांडनुसार कार आपोआप चालणार आहे.

30 हजार डॉलर्समध्ये कार खरेदी करता येणार?
या कारचे अनावरण करताना खुद्द एलॉन मस्क उपस्थित होते. विशेष म्हणजे या सायबरकॅबमध्ये चक्क एलॉन मस्क यांनी प्रवासही केला. कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सायबरकॅब आणि रोबोव्हॅनबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली नाही. मात्र अशा प्रकारच्या कार खरेदी करण्यासाठी जे उत्सूक आहेत ते 30 हजार डॉलर्समध्ये ही कार खरेदी करू शकता, असे एलॉन मस्क यांनी सांगितले आहे. 2027 पर्यंत या कारच्या उत्पादनाला सुरुवात होणार आहे.

टेस्ला कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक रोबो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *