महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑक्टोबर ।। त्रिरत्न बौद्ध महासंघाचे जेष्ठ धम्मचारी रत्नसागर (अध्यात्मिक नाव)मुळ-नाव रमेश रामभाऊ सोनवणे असून ते रहाटणी येथे राहतात. त्रैलोक्य बौध्द महासंघाच्या माध्यमातून अनेक धम्मचारी धम्ममित्राना कल्याणमित्र (गुरू)म्हणून राहिलेले आहेत भाजे मळवली येथील सद्धम प्रदिप ध्यान साधना केंद्र येथे त्यांनी चेअरमन म्हणून अनेक वर्षे जबाबदारी सभाळली आहे. गेल्या २८ वर्ष ते संस्थेच्या माध्यमातून इंग्लंड येथे गेले आहेत आणि तेथील मनपा गेल्या २५ वर्षांपासून आजपर्यंत नोकरी सरकारी करत आहेत. त्यांनीमावळात मळवली मु.पो. भाजे गावांत पाण्याचं मोठं तळ बांधण्यात स्थानिक लोकांना मदत केली. तसेच ७ मुलींचे (मराठा समाजाच्या) लग्न करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली आणि पुणे त्यानंतर विदर्भ येथे नागपूर आणि वर्धा येथे आध्यात्मिक केंद्राची 2 वर्ष चेअरमन आणि सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक, क्षेत्रांत काम केले .युवकांना मार्गदर्शन करणे,गोर -गरिबांना आर्थिक ईतर मदत केली यावेळी पत्रकार कक्षेत मुलाखत घेत असतांना पत्रकार – दादाराव आढाव,भीमराव तुरूकमारे, जेष्ठ पत्रकार संतलाल यादव सुनिल कांबळे ,कलिंदर शेख,अमोल डंबाळे मुझफ्फर इनामदार, मुकेश जाधव माणिक पौळ,सचिन सोनवणे, गणेश शिंदे,यांनी त्यांचा शाल श्रीफळ, आणि गुच्छ देऊन सन्मान आणि सत्कार केला.
त्या नंतर पत्रकार परिषेदेत धम्मचारी रत्नसागर यांनी केलेले कार्य किती मौल्यवान आहे. त्यांच्या वाणीतून लक्षात येत होते. इंग्लंड मध्ये 300 भारतीय लोकांचा ग्रुप करून त्यांना ध्यान आणि अध्यात्मिक अभ्यास घेत आहेत. त्यांना बुध्द,फुले, शाहू, आंबेडकर, यांच्यावर वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत असतात
गेल्या 25 वर्षा पासून इंग्लंड मध्ये मँचेस्टर येथे मनपा सरकारी नोकरी करीत असतांना पत्नी डॉक्टर असून फिलिपिन्स देशाची नागरिक असतांना त्यांचा ऑन लाईन पद्धतीने परिचय झाला त्यांनी कायदेशीर लग्न केले. भारतीय नागरिक जेव्हा इंग्लंड मध्ये आल्यावर त्यांना संपूर्ण देश बघण्यासाठी त्यांचा तेथील आर्थिक भार सर्व 300 भारतीय टिम एकत्र खर्च उचलतात आणि पुन्हा इंग्लंड सारख्या प्रगतीशील राष्ट्रामध्ये येणे शक्य होणार नाही म्हणून पाहण्यासाठी त्यांना मदत करतात. तेथून सोशल काम करणारी करुणा ट्रस्ट आहे. त्यांच्या अंतर्गत भारतातील सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रांत काम करणार्यांनाआर्थिक मदत व गोरगरीब युवकांना शैक्षणिक व गंभीर स्वरूपाच्या आजारी व्यक्तींना आर्थिक मदत दिलेली आहे. त्यांचा स्वभाव अतिशय नम्र असून पत्रकारांनी त्यांना तेथील देशाचं राहणीमान, आणि तेथील सामाजिक काम कशा प्रकारे केले जाते ते त्यांनी साध्याआणि सोप्या भाषेत उत्तर देतांना त्यांनी सांगितले. यावेळी अनेक विषयांवर चर्चा,केल्यामुळे त्यांचा स्वभाव साधा असून सर्व पत्रकार आवडल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरांतील पत्रकारांना त्यांनी इंग्लंडला येण्याचं निमंत्रण दिले तेथील विजा,राहण्याची सर्व सोय आणि इंग्लंड दाखवण्याची सोय निश्चित करणार असे सर्व पत्रकारांना आश्वासन रत्नसागर यांनी दिले आहे.