महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। गेल्या वर्षी दिवाळीपासून भारतीय शेअर बाजाराने दणदणीत परतावा दिला आहे. मागील वर्षी १२ नोव्हेंबर २०२३ पासून BSE सेन्सेक्स २५ टक्क्यांनी वधारला तर याच कालावधीत BSE मिडकॅप आणि BSE स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ४७% आणि ४५% वाढले आहेत. दरवर्षी दिवाळीनिमित्त शेअर बाजारात एक तासाचा खास दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केले जाते. १ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजार एक तासासाठी खुला राहील.
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग 2024 चे वेळापत्रक काय
बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) च्या वेबसाइटनुसार यावर्षी मुहूर्त ट्रेडिंग १ नोव्हेंबर २०२४ रोजी (दिवाळी – लक्ष्मी पूजा) आयोजित केले जाईल. साधारणपणे १ नोव्हेंबर सार्वजनिक, बँक आणि शेअर बाजार सुट्टी असेल पण गुंतवणूकदारांसाठी खरेदी/विक्रीसाठी ट्रेडिंग विंडो फक्त एका तासासाठी उघडली जाईल.
बीएसई आणि एनएसईवर यादरम्यान इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटीज, बॉण्ड्स आणि सध्याच्या बाजारपेठेतील ट्रेडिंग या एक तासाच्या स्पेशन मुहूर्ताच्या सत्रात पार पडेल. एक तासाच्या सत्रात बाजारपूर्व आणि पोस्ट-मार्केट सेटलमेंट देखील होतील. सोप्या शब्दात बोलायचे तर या एका तासभरात बाजार नेहमीच्या ट्रेडिंग दिवसांप्रमाणे उघडेल.