![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। पुण्यात खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन नव्या मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत आज मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळेपुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.
दरम्यान पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे केद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत.
पुण्यात आणखी नवे दोन मेट्रो मार्ग !
१) खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी
२) नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग
या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली असून यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.
पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2024
![]()
