![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑक्टोबर ।। सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. १५ ऑक्टोबरनंतर महिलांचे फॉर्म स्विकारले जाणार नाही.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. त्यानंतर आता महिलांना दिवाळी गिफ्ट म्हणून बोनस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत त्या महिलांनी आज अर्ज करावेत. (Ladki Bahin Yojana Update)
दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी अधिक चांगली होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या शूभमूहूर्तावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. ही रक्कम दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांपेक्षा वेगळी असेल.या योजनेत काही महिलांना अतिरिक्त २५०० रुपये दिले जाणार आहे. दिवाळीआधी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र सरकारने महिलांनी ही भेट दिली आहे. सरकारने लाडकी बबीण योजनेत लाभार्थ्यांना ३००० रुपये बोनस दिला जाणार आहे. (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना ५ महिन्याचे ७५०० रुपये जमा झाले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आले आहेत.

