महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ३० जुलै – हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार कोरोनाबाबत गरजेपेक्षा अधिक माहिती जमा करून लोक मानसिक तणावाचा शिकार होत आहेत, त्यांच्या मनात भीतीने घर केलं आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. याला डूम स्क्रोलिंग असं म्हटलं आहे. डूम स्क्रोलिंग म्हणजे कोरोना महासाथीबाबत माहिती घेण्यासाठी इंटरनेट, न्यूज मीडिया, सोशल मीडिया मर्यादेपेक्षा भरपूर प्रमाणात वापरणं.
कोरोनाच्या या परिस्थिती सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपण आपल्या हातात मोबाइल घेतो आणि कोरोनाबाबत काही नवीन बातम्या आल्या आहेत का ते पाहतो. अगदी वर्तमानपत्र आणि टीव्हीवरदेखील आपण कोरोनाच्याच बातम्या पाहतो. कोरोनाबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र सातत्याने कोरोनाच्या बातम्या शोधल्याने त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे. मनात नकारात्मक विचार निर्माण होत आहेत आणि याबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी सावध केलं आहे.
यामुळे मनात नकारात्मक विचार येतात, नकारात्मक बातम्यांवर जास्त लक्ष केंद्रीत केलं जातं आणि परिणामी मानसिक तणाव, डिप्रेशन, निराशा अशा समस्या उद्भवतात. लोकं महासाथीत सातत्याने घरात बंद आहेत, त्यामुळे असं होत असल्याचं तज्ज्ञ म्हणालेत.
कोरोना महासाथीबाबत आपल्याला जागरूक राहण्याची गरज आहे. कारण या दिवसात डूम स्क्रोलिंगमध्ये सहभागी असलेले लोक याची जास्त शिकार होत आहे. त्यांची नजर नेहमी नकारात्मक बातम्यांवर असते. यामुळे त्यांच्या भाषेवर, बोलण्यावर मानसिकदृष्ट्या परिणाम होतो आहे. यामुळेच तणाव, डिप्रेशनसारखी परिस्थिती उद्भवते आणि विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.