ब्रॉडने 500 विकेट्स घेतल्यानंतर युवराज केले अभिनंदन …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ३० जुलै – वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ऐतिहासिक कामगिरी करत कसोटीमध्ये 500 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ सातवा खेळाडू आहे. सर्वच स्तरातून ब्रॉडचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील ट्विट करत ब्रॉडचे कौतुक केले.

युवराजने आपल्या ट्विटमध्ये ब्रॉडला एका ओव्हरमध्ये मारलेल्या 6 षटकारांचा देखील उल्लेख केला आहे. त्याचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

युवराजने लिहिले की, मला माहिती आहे जेव्ही मी स्टुअर्ट ब्रॉडबद्दल काही लिहिल त्यावेळी लोक 6 षटकारांबाबत बोलतील. आज मी चाहत्यांना विनंती करतो की त्याने जी कामगिरी केली आहे, त्याचे कौतुक करा. 500 कसोटी विकेट्स घेणे हे काही सोपे नाही. यासाठी मेहनत, निष्ठा आणि दृढनिश्चय लागतो. ब्रॉडी तू महान आहेस. सलाम.

युवराजने 2007 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारले होते. त्यामुळे कधीही ब्रॉडचा उल्लेख आल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहते या गोष्टीचा नक्कीच उल्लेख करतात. युवराजचे हे ट्विट व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *