Gold Price Today: सोने विक्रमी दरावर : सणासुदीत सोन्याला सोनेरी दिवस, पाहा आजचा भाव किती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑक्टोबर ।। दिवाळीअवघी काही दिवसांपूर्वी आली असली तरी सोन्याने हाहाकर माजवला आहे. सणासुदीत सोन्याच्या दागिन्यांना भरघोस मागणी असल्याने सोन्याचे दर काहीचा काही वाढलेले पाहायला मिळाले. दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लोकांनी आर्वजून सोन्याचे दागिने बनवतं असल्याने सोन्याचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. सोन्याचा भाव आज ५०० रुपयांनी वाढला असून ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

सराफा बाजारात सोन्याची किंमत
दिवाळीपूर्वी दागिने खरेही करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार. दसऱ्याचा शुभ दिवसावर आवर्जून लोक दागिने खरेदी करतात त्यामुळे सोन्याचे भाव वाढलेले पाहायला मिळाले. आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना सोन्याच्या दरात काहीच घसरण पाहायला मिळत नाही. सणासुदीसोबतच आता लग्नाचा सीझन येणार असल्याने सराफा बाजारात दिवसागणीक सोन्याच्या किंमती नवनवीन उच्चांकच गाठणार आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,९८० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ७२,४०० रुपये आहे. १ किलो चांदीची किंमत ही आज ९९,००० रुपये इतकी आहे.

वायदे बाजारात सोन्याची किंमत
दसऱ्याचा शुभ दिवसावर सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीही वाढलेल्या पाहायला मिळाल्या. आता दिवाळीपर्यंत सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळतील असे एकंदरीतच चित्र दिसतंय. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार आज ५०३ रुपयांच्या वाढीसह ७७,२९४ रुपयांवर उघडला. मागील बंद हा ७७, १०७ रुपयांवर झाला. आज सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर कराराची किंमत ही ७७,५८८ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७२,४०० रुपये ७१,६०० रुपये
पुणे ७२,४०० रुपये ७१,६०० रुपये
नागपूर ७२,४०० रुपये ७१,६०० रुपये
कोल्हापूर ७२,४०० रुपये ७१,६०० रुपये
जळगाव ७२,४०० रुपये ७१,६०० रुपये
ठाणे ७२,४०० रुपये ७१,६०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७८,९८० रुपये ७८,११० रुपये
पुणे ७८,९८० रुपये ७८,११० रुपये
नागपूर ७८,९८० रुपये ७८,११० रुपये
कोल्हापूर ७८,९८० रुपये ७८,११० रुपये
जळगाव ७८,९८० रुपये ७८,११० रुपये
ठाणे ७८,९८० रुपये ७८,११० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *