महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑक्टोबर ।। पिंपरी-चिंचवडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेवर पतीसह मित्रांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडलीय. महिलेच्या पतीसह ४ जणांविरोधात रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेवर तिच्या पतीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने ३ जणांना वेगवेगळ्या दिवशी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या पतीने या लैंगिक अत्याचाराची घटना आपल्या मोबाईलमध्ये शूट केली. आरोपी पतीने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली.या व्हिडीओच्या माध्यमातून तो पीडित महिलेला छळत होता. या लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात रावेत पोलिसांनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या पतीने आपल्या मोबाईलमध्ये लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ शूट करून घेतले असल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. विवाहित महिलेला तिचे लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पतीने तिच्यावर तीन वेगवेगळ्या जणांकडून लैंगिक अत्याचार करून घेतले. त्यानंतर आरोपीने स्वतः आपल्या पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध स्थापित केले. सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधी दरम्यान पीडित महिलेसोबत हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलिस करत आहेत. या घटनेमुळे पिंपरी-चिचंवडमध्ये खळबळ उडाली आहे.