IND vs NZ: बेंगळुरुत रचिन रविंद्रने पाडला धावांचा पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑक्टोबर ।। भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना हा चिन्नास्वामी स्टेडियमवर 16 ऑक्टोबर 2024 पासून खेळवला जात आहे. पहिल्या सामन्याचा पहिला दिवस हा पावसामुळे वाहून गेला तर दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो सपशेल अपयशी ठरला. भारत पहिल्या डावात 46 वर सर्वबाद झाला. याउलट किवी संघ भारतावर बरसला त्यात मोलाचे योगदान आहे ते रचिन रविंद्रचे. भारताविरुद्ध रचिन रविंद्रने 124 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

पहिल्या डावात रविंद्र भारतासाठी भिंत बनला आहे. त्याने बंगळुरू कसोटी सामन्यात शतक झळकावून टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. रविंद्रने 124 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 2 षटकारही मारले. भारतीय भूमीवर शतक झळकावणारा तो आता न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील 21 वा खेळाडू ठरला आहे.

तिसऱ्या दिवशी रचिन रविंद्रने 34 चेंडूत 22 धावा करत आपला डाव सुरू ठेवला. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या, पण रविंद्र दुसऱ्या टोकाला ठाम होता. बेंगळुरू कसोटीच्या सुरुवातीच्या सत्रात डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री आणि टॉम ब्लंडेल यांनीही विकेट गमावल्या. दरम्यान, रविंद्रला टीम सौदीची साथ लाभली, तिसऱ्या दिवशी लंच टाईमपर्यंत त्याने 49 धावा केल्या होत्या आणि रविंद्रसोबत 122 धावांची भागीदारी झाली.

टीम साऊदीसोबत शतकी भागीदारी
रचिन रवींद्रने 2024 मध्ये आतापर्यंत 13 कसोटी खेळल्या आहेत, ज्यामध्ये रचिनने 50 पेक्षा जास्त सरासरीने 700 हून अधिक धावा केल्या आहेत. बेंगळुरूमध्ये कसोटी शतक झळकावताना रचिन रविंद्रने टीम साऊथीसोबत 8व्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली. लंचपर्यंत टीम साऊदीने 49 नाबाद होता.

रचिन रविंद्रचे रेकॉर्ड
रचिन रवींद्र न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळतो. रचिन रविंद्रने न्यूझीलंडसाठी 10 कसोटी, 25 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 776, 820 आणि 231 धावा केल्या आहेत. रचिन रविंद्र देखील लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजी करतो आणि त्याच्या नावावर कसोटीत 10, एकदिवसीय सामन्यात 18 आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 13 विकेट आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *