आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली ; करदात्यांना सरकारचा दिलासा;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ता. ३० जुलै – नवी दिल्ली : देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं करदात्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (सीबीडीटी) इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ जुलै वरून वाढवून ३० सप्टेंबर केली आहे. आयकर विभागानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. नवे आणि रिवाईज्ड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.

करोनाच्या महामारीमुळे येणारे अडथळे आणि करदात्यांना सुलभपणे नियमांचं पालन करता यावं म्हणून २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवल्याचं आयकर विभागानं ट्विटद्वारे सांगितलं. सर्वात पहिल्यांदा रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर ही ती वाढवून ३० जून करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ती मुदत वाढवून ३१ जुलै करण्यात आली होती आणि ती पुन्हा वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *