आता ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना अडकणार नाही पैसे, IRCTC ची नवीन सुविधा प्रवाशांच्या फायद्याची

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ फेब्रुवारी ।। ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा तिकीट ऑनलाईन बुक केल्यावर तिकीट कन्फर्म नसतानाही पैसे कापले जातात. मुख्यतः तत्काळ तिकिट बुक करणाऱ्या आणि तिकिट वेटिंगलिस्टमध्ये असणाऱ्या प्रवाशांसोबत असं घडते. परंतु, आता आयआरसीटीसी वेबसाइट आणि ॲपमध्ये एक सुविधा देण्यात आली आहे ज्याद्वारे प्रवाशाचे तिकीट कन्फर्म असल्यासच खात्यातून पैसे कापले जातील. याशिवाय जर तुमचे तिकीट बुक झाले नसेल तर रिफंडसाठी ३-४ दिवस प्रतीक्षा करण्याची गरज नाही आणि त्वरित तुमचे पैसे त्वरित रिफंड केले जातील.

कसं मिळणार पूर्ण रिफंड
भारतीय रेल्वेने ई-तिकिटांसाठी त्वरित पैसे न देता रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा सुरू केली आहे. तथापि, ही सुविधा IRCTC i-Pay पेमेंट वापरकर्त्यांसाठी आहे, ज्याला ऑटोपे म्हणतात. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे IRCTC च्या iPay पेमेंट गेटवेचे ‘ऑटो पे’ वैशिष्ट्य UPI, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड्सशी जोडले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, जर ऑटो पे वापरून ट्रेनचे तिकीट बुक केले आणि तुमचे तिकीट बुकिंग पीएनआर जनरेट होईल तेव्हाच तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.

रेल्वेच्या नव्या सुविधेचा कोणाला होणार फायदा
महागड्या किमतीचे ई-तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळेल. तसेच वेटिंग लिस्टमध्ये असलेले तिकीट, जनरल तिकीट आणि इन्स्टंट तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळेल. तसेच तुमचा ट्रेन तिकीट बर्थ उपलब्ध नसेल किंवा रूमचा पर्याय दिसत नसेल, तर ट्रेन तिकीट बुकिंगवरील पैसे तुमच्या खात्यातून कापले जाणार नाहीत.

याशिवाय चार्ट तयार केल्यानंतरही तिकीट वेटिंगमध्ये असल्यास फक्त कॅन्सलेशन शुल्क लागू होईल, तर उर्वरित पैसे खात्यात परत केले जातील.वेटिंग लिस्टमध्ये तिकीट बुक करणाऱ्या व्यक्तीला कन्फर्म तिकीट न मिळाल्यास कापलेली रक्कम तीन ते चार दिवसांत रिफंड केली जाईल.
जर एखादी व्यक्ती वेटिंग लिस्टमध्ये तिकीट बुक करण्यासाठी IRCTC iPay ची ऑटोपे सुविधा वापरत असेल आणि जर कन्फर्म तिकीट मिळाले नाही तर लगेच पैसे परत केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *