महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑक्टोबर ।। RRR सेंटर उपक्रम व RRR सेंटर बाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री.राजू साबळे यांच्या हस्ते करण्यात आले मुख्य आरोग्य निरीक्षक श्री.दत्तात्रय गणगे आरोग्य निरीक्षक श्री.संजय गेंगजे सामाजिक कार्यकर्ता सौ. रेणुका भोजने सहाय्यक आरोग्य निरीक्षक:-श्री.बाबासाहेब जमादार सर आरोग्य मुकादम :- श्री.शंकर गायकवाड बेसिक्स झोन इन्चार्ज:- श्री.दिलकुश कारपेंटर यांच्या उपस्थितीत उपक्रम राबविण्यात आला व नागरिकांना टीम बेसिक्स द्वारे आज दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी मोरवाडी परिसर येथील नागरिकांना RRR बाबत जनजागृती करण्यात आली.
Reduce– वस्तू कमी करणे.
Reuse – पुन्हा वापरणे
Recycle – पुनर्चक्रन करणे.
घरात जुन्या वस्तू असतात. पण, त्या निरुपयोगी असतात. मग त्या इलेक्ट्रिक वस्तू, पुस्तकं किंवा कपडे असू शकतात. अशा वस्तू कपाटात पडून असतात. अशावेळी त्या कुणालातरी दान केल्यास त्यातून ते टाकाऊतून टिकावू वस्तू तयार करू शकतात. वापरलेली जुनी पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर म्हणजेच RRR सेंटर येथे आपल्या घरातील वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू RRR सेंटरमध्ये जमा करावे.
गरजवंतांना मदत करावी. जेणेकरून संकलित कलेल्या वस्तू नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादन तयार करण्यात येईल. असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
तसेच स्वच्छता पथनाट्य सादर करण्यात आले पदार्थाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरण, कचरा वर्गीकरणाचे फायदे व RRR सेंटर याबाबत जनजागृती करण्यात आली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये अव्वल येण्यासाठी सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले. स्वच्छ पिंपरी-चिंचवड सुंदर पिंपरी-चिंचवड चा नारा देण्यात आला सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेणुका भोजने व जेष्ठ नागरिक संघाच्या पदाअधिकारी यांचा सत्कार करण्यात आला महिला बचत गट सदस्य , मोरवाडी जेष्ठ नागरिक संघ सदस्य , आरोग्य कर्मचारी वर्ग परिसरातील नागरिक उपस्थित होते.