अख्ख कुटुंब खोटारडं आहे! सलीम खान यांना बिष्णोई महासभेचं सडेतोड उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑक्टोबर ।। बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला अनेक वर्षांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मात्र हे प्रकरण तेव्हा वाढलं जेव्हा सलमानचे जवळचे मित्र आणि आमदार बाबा सिद्दीकी यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. याप्रकरणानंतर सलमानची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली होती. त्यानंतर सलीम खान यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत आपण आणि आपल्या कुटुंबाने एक झुरळही मारलं नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी कधीच कुणासोबत काही चुकीचं केलं नाही. सलमान कुणाची आणि का माफी मागेल? सलीम खान यांच्या या वक्तव्यावर आता बिष्णोई महासभेचे अध्यक्ष त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. सलमानचं पूर्ण कुटुंब खोटं आहे असं ते म्हणाले आहेत.

सलमान ३ दिवस तुरुंगात का होता?
बिष्णोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुधिया यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना देवेंद्र बुधिया म्हणाले, ‘जर सलमान दोषी आढळला असेल, तर त्याचे कुटुंबीय कसे म्हणू शकतात की त्याने झुरळही मारलं नाही. सलीम खान यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे समाज दुखावला गेला आहे. त्याने नक्कीच शिकार केली आहे आणि आमच्या गावाजवळ शिकार केली आहे. पोलीस आणि वनविभागाने त्याला पकडलं होतं आणि तो ३ दिवस तुरुंगात होता.

फक्त तोच खरा आणि बाकी सगळे खोटे?
सलीम खान यांनी दिलेल्या वक्तव्यावर ते पुढे म्हणाले, “त्याच्याकडे हत्यार होतं ते पकडलं गेलं. त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे… म्हणजे तो खरं बोलत आहे आणि पोलीस, वन विभाग आणि इतर सगळे खोटे आहेत. बिष्णोई समाज असो की लॉरेन्स, लाच मागणे आणि पैसे घेणे हे आमच्या रक्तात नाही. आम्ही नि:स्वार्थपणे वन्य प्राणी, झाडे वाचवतो, पर्यावरण वाचवतो आणि आम्हाला माहीत आहे की आपले 363 लोक झाडांसाठी शहीद झाले आहेत. दरवर्षी आम्ही शहीद होतो. आमच्या गावात बचाव केंद्रे उघडली आहेत.’ यासोबतच देवेंद्र म्हणाले की त्याने पैशनाबद्दल बोलून आणखी एक अपराध केला. आम्हाला हरामाचे पैसे नको. सलमानला माफी नाही मागायची तर नाही मागितली तरी चालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *