महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २०ऑक्टोबर ।। छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना डिवचले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमदेवार उभे करावेत, असे चॅलेंज छगन भुजबळ यांनी दिलेय. ते नाशिकमध्ये बोलत होते.
लोकशाही आहे. जी भूमिका घेतील ते घेतील. मला तर असं वाटतं उमेदवार उभे करायला पाहिजेत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे कितीतरी पक्ष निर्माण झालेले आहेत. त्यांनी सुद्धा आजमावायला हरकत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?
फार थोडेसे लोक राहिले आहेत सगळ्यांचे पैसे खात्यामध्ये गेलेले आहेत. 98 टक्के पेक्षा जास्त आमच्या महिला भगिनींना पैसे मिळाले आहेत. ही आमची नियमीत योजना आहे, निवडणुकीसाठी असलेली स्कीम नाही.
जागा वाटपावर काय म्हणाले ?
शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास किंवा महायुती काही जागा वाटपावर चर्चा सुरुच राहिली. फॉर्म पण भरतील मग शेवटच्या वेळी काय फॉर्म परत घेतील. मग खरी निवडणुकीची लढाई सुरू होईल, असे भुजबळ म्हणाले.
