UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑक्टोबर ।। सायबर स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. यात अनेक निष्पाप लोक अडकतात. ते यामध्ये आयुष्यभराची कमाई गमावतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या सहा महिन्यांत, UPI संबंधित २६ हजार लोकांची फसवणूक झाली आहे.

हे लोक एक फेक इमेज तयार करतात, ज्यामध्ये पैसे पाठवल्याची म्हणजे सेंट केल्याची माहिती असते. या टेक्निकचा वापर करून ते लोकांकडून पैसे परत मागतात. अशा स्थितीत ते पुढे घोटाळा करतात.

स्कॅमर्स AI Voice Cloning आणि Deepfake चा वापर करून मित्र किंवा नातेवाईक असल्याचं भासवतात. यानंतर काहीतरी गरजेचं कारण सांगतात किंवा इमर्जन्सी असल्याचं सांगून पैसे मागतात.

सायबर स्कॅमर लोकांची फसवणूक करण्यासाठी बनावट UPI QR कोड वापरतात. यानंतर हे बनावट QR कोड युजर्सना फेक वेबसाइटवर घेऊन जातात आणि पेमेंट करण्यास सांगतात.

अनेक संशयास्पद एप्स लोकांचं स्क्रीन रेकॉर्ड करतात. यानंतर ते बँकेचे लॉगिन आणि UPI इत्यादी आणि त्याचा कोड चोरतात. यानंतर ते अगदी सहजपणे बँक खात्यात प्रवेश करतात.

सायबर स्कॅमर्सपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याबाबत जाणून घेऊया…

UPI पिन शेअर करू नका
UPI पिन हा तुमच्या डेबिट कार्डच्या ATM पिनसारखा असतो. तो कोणाशीही शेअर करू नका. स्कॅमर कस्टमर केअर किंवा बँक अधिकारी असल्याचं सांगतात आणि UPI पिन किंवा OTP मागतात. अशा परिस्थितीत पिन कोड कोणाशीही शेअर करू नका.

पेमेंट रिसिव्ह करताना काळजी घ्या
पेमेंट करण्यासाठी UPI पिन एंटर किंवा पेमेंट रिक्वेस्टवर क्लिक करण्याची गरज नसते. जर कोणी तुम्हाला पिन एंटर करण्यास सांगितलं तर तो तुमच्या बँक खात्यात घुसू शकतो.

पेमेंट लिंकपासून सावध राहा
एसएमएस, ईमेल किंवा मेसेजिंग एप्सद्वारे पाठवलेल्या कोणत्याही अनोळखी पेमेंट लिंकवर क्लिक करणं टाळा. स्कॅमर अनेकदा तुमचे बँक तपशील आणि वैयक्तिक तपशील चोरण्यासाठी या लिंक्सचा वापर करतात.

स्ट्राँग पासवर्ड ठेवा
स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याला स्ट्राँग पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकने सुरक्षित करणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही अँटीव्हायरस इत्यादी वापरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *