महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑक्टोबर ।। पिंपरी चिंचवड शहर … पुणे जिल्हा गृहरक्षक दल (गृह मंत्रालय) पुणे विभाग कार्यालय मध्ये कार्यरत असलेले विभाग नाईक पदावर कार्यरत असलेले गृहरक्षक जवान श्री उमेश लोंढे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्ध कलेपासून प्रेरित होऊन केला नवीन जागतिक स्तरावरील वर्ल्ड जॅव्हलिन आर्चरी या खेळाचा अविष्कार…
या गृहरक्षक दलाच्या जवानाचे नाव उमेश लोंढे असून सध्या ते गृहरक्षक दलात विभाग नाईक पदावर कार्यरत असून त्याचप्रमाणे मार्शल आर्ट खेळामध्ये ब्लॅक बेल्ट ५ दान पदवी धारक आहेत व्यवसायाने शिक्षक असल्याने गेली अनेक वर्ष त्यांचा या खेळावर संशोधन प्रबंध चालू आहे ..
हा खेळ श्री शिवछत्रपती यांच्या स्वराज्यातच तयार झाला असल्याचा अभिमान आहे ..या खेळा करीता प्राध्यापक डॉ शरद आहेर, मार्गदर्शन प्राचार्य डॉ सोपान कांगणे तसेच वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र निकाळजे सर यांनी मोलाचे तांत्रिक सहकार्य केले..
आत्तापर्यंत या खेळात सहभागी झालेले देश पुढील प्रमाणे इराक, केनिया लाओस श्रीलंका पाकिस्तान इराण, कंबोडिया नेपाळ बांगलादेश, मोरोक्को, तांजनिया, इराण, व कांगो त्याचप्रमाणे भारतामधे तेलंगाना, महाराष्ट्र, सिक्कीम, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हरियाणा, बिहार, केरळ, कर्नाटक राज्यांमधे महारष्ट्र मधे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, अहील्यानगर, धाराशिव, पिंपरी चिंचवड, पुणे, डौंड, नांदगाव, लातूर, नाशिक, मालेगासातारा, छत्रपती संभाजी नगर, जिल्ह्यामधे खेळला जात आहे..
अत्यंत कमी खर्चात तसेच कमी साहित्यात खेळला जाणारा हा खेळ असून यासाठी कमीत कमी साधनसामुग्रीचा यामध्ये समावेश आहे ..खेळाडू स्वतः त्याचा सराव कोणत्याही मार्गदर्शकां शिवाय करू शकतो..आधुनिक स्तरावर खेळाचे स्वरूप देऊन याला वर्ल्ड जॅव्हलिन आर्चरी या संघटनेचे नाव देऊन याची स्थापना करण्यात आली आहे यामुळे शहरी ग्रामीण उत्कृष्ट कला क्रीडा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .
याने जुन्या आणि नवीन अशा दोन्ही खेळांचा समावेश करून याला अचूकता व भेदकता या दोन मुख्य कौशल्यांवर आधारित याची रचना करण्यात आली आहे.
लवकरच हा खेळ खेलो इंडिया, पोलीस गेम्स, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया , NIS, Nehru Yuva Kendra sanghtana, क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय क्रीडा भारतीय ऑलिम्पिक संघ व मंत्रालाकडून खेळ सूचित आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.ज्या मुळे 5 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येईल, व मूळ महाराष्ट्रीय मर्दानी खेळ जीवंत राहील.लवकरच आगामी काळात या खेळाची विश्व चषक स्पर्धा भारतात पुणे जिल्ह्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे.खेळास सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी, क्रीडा शिक्षक संघटना, स्पोर्ट विशेष तज्ञ डॉक्टर,क्रीडा संस्था यांनी शुभेच्छा पर पाठिंबा दर्शविला आहे.