सोने, चांदीचे भाव आगामी काळात कमी होणार का? जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑक्टोबर ।। सोने आणि चांदीच्या भावातील तेजीचे वारे मंगळवारी कायम राहिले. यामुळे सोने आणि चांदीच्या भावाने सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. दिल्लीतील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ३५० रुपयांनी वधारून ८१ हजार रुपयांवर गेला. याचवेळी चांदीच्या भावात प्रति किलोला १ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन भावाने १ लाख रुपयांची पातळी ओलांडली.

सणासुदीच्या काळामुळे ग्राहकांकडून सोन्याची खरेदी वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. याचवेळी औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीचे भाव वाढले आहेत. दागिने आणि भांड्यांसाठीही चांदीला मागणी वाढल्याचा परिणामही दिसून येत आहे. चांदीच्या भावात सलग पाचव्या सत्रांत वाढ नोंदविण्यात आली आहे. चांदीचा भाव प्रति किलोला १ हजार ५०० रुपयांनी वाढून १ लाख १ हजार रुपयांवर पोहोचला, अशी माहिती हिंदुस्तान झिंक लिमिटेडचे मुख्याधिकारी अरूण मिश्रा यांनी दिली.

वस्तू वायदा बाजार मंच एमसीएक्सवर मंगळवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला २०८ रुपयांनी वधारून ७८ हजार २४७ रुपयांवर गेला. याचवेळी चांदीचा भाव प्रति किलोला ८८२ रुपयांची उसळी घेऊन ९८ हजार ३३० रुपयांवर पोहोचला. जागतिक धातू वायदा बाजार मंच कॉमेक्सवर सोन्याचा भाव प्रतिऔंस २ हजार ७४७ डॉलरवर गेला तर चांदीच्या भावाने ३४.४१ डॉलरची उच्चांकी पातळी गाठली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *