Railway Reservation: 1 नोव्हेंबरपासून रेल्वे आरक्षणाबाबत नवा नियम; प्रवाशांवर काय परिणाम होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑक्टोबर ।। रेल्वे तिकीट अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या नव्या नियमाअंतर्गत प्रवासाच्या तारखेच्या फक्त ६० दिवस आधीच तिकीट बुकिंग करता येणार आहे. या नव्या नियमाचा आपल्या प्रवासावर नेमका काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या.

निर्णय:

परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे आगाऊ आरक्षणाच्या नव्या नियमानुसार १ नोव्हेंबर २०२४ पासून तुम्ही रेल्वे आरक्षण करायला गेलात तर प्रवासाच्या ६० दिवस म्हणजे दोन महिने आधीचं तिकीटं आरक्षित होऊ शकेल.

मात्र जर एखाद्या प्रवाशाने ३१ ऑक्टोबरपर्यंत तिकीट आरक्षित केलेलं असेल (म्हणजेच यापूर्वीच्या १२० दिवसांच्या आरक्षण कालावधीच्या नियमान्वये), तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण त्यांनी केलेलं आरक्षण कायम राहणार आहे.

1981 मध्ये आरक्षण कालावधीची मर्यादा काय होती?तिकीट आरक्षणाच्या धोरणात रेल्वेने वेळोवेळी बदल केलेले आहेत. रेल्वेने १६ वर्षांपूर्वी आगाऊ आरक्षण मर्यादा १२० दिवसांवर आणली होती. त्याची सुरूवात १ मे २००८ पासून झाली होती. त्याआधी १९९५ ते २००७ दरम्यान, आरक्षण कालावधीची मर्यादा ६० दिवसांपर्यंत होती. १९८८ ते १९९३ दरम्यान, रेल्वेने आगाऊ आरक्षण कालावधी जेमतेम ४५ दिवसांपर्यंत(म्हणजे एक महिना आणि १५ दिवस साधारण) कमी करण्याचा प्रयोग केला होता. १९८१ ते १९८५ दरम्यान, आगाऊ आरक्षण कालावधी ९० दिवसांसाठी खुला केला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *