महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवी दिल्ली – ता. ३१ जुलै – गुरुवारी केंद्र सरकारने कलर टीव्हीच्या आयातीवर बंदी घातली. चीनच्यासारख्या देशातून टीव्ही खरेदी करून उत्पादनाला चालना देणे कमी करण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, कलर टेलिव्हिजनच्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.
भारताशी पंगा घेतलेल्या चीनला चहूबाजूंनी घेरण्याची योजना आहे. नुकतचं भारतात राफेल आल्यानं आता आणखीन भारताची ताकद वाढली आहे. मोदी सरकारनं चीनकडून येणारी आयात रोखण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला त्यानंतर आणखी एक पाऊल उचलण्यात आल्यानं चीनला मोठा झटका बसला आहे.कलर टीव्हीसाठी आता DGFT कडून आयात करण्याचं वेगळं लायसन घ्यावं लागणार आहे. या लायसन्स नंतर चीनकडून आयात झालेले टीव्ही खरेदी करता येणार आहेत. याशिवाय व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया आणि इंडोनेशिया या देशांचाही यामध्ये समावेश आहे. याआधी भारतानं जवळपास 120 हून अधिक चीन अॅप आणि वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
Government puts restrictions on imports of colour television sets: DGFT notification
— Press Trust of India (@PTI_News) July 30, 2020
केंद्र सरकारनं हे निर्बंध 36 सेमी ते 105 सेमी आकाराच्या टीव्ही स्क्रीनसाठी घातले आहेत. हा निर्बंध 63 सेमी पेक्षा कमी स्क्रीन आकाराच्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) टीव्ही सेटवर देखील लागू करण्यात येणार आहे.मागच्या वर्षात भारतात 428 मलियन डॉलर टीव्हीची आयात करण्यात आली. तर व्हिएतनाममधून 293 मिलियन डॉलर एवढी आयात करण्यात आली होती.
सरकारने चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या सोलर सेलवर (Solar Cell) एका वर्षासाठी सेफगार्ड ड्यूटी (Safeguard Duty) लावली आहे. आता सोलर सेलवर हे शुल्क जुलै 2021 पर्यंत लागू असेल. विशेष म्हणजे याचा थेट फायदा देशांतर्गत कंपन्यांना होणार आहे. डीजीटीआरच्या निष्कर्षानुसार राजस्व विभागाने एका अधिसूचनेत सांगितले की ते या उत्पादनावर सेफगार्ड ड्यूटी लावत आहे. अधिसूचनेनुसार 30 जुलै 2020 ते 29 जुलै 2021 पर्यंत सोलर सेलवर 14.9 टक्के सेफगार्ड ड्यूटी लावण्यात येईल.