महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. ३१ जुलै – उद्यापासून नवीन महिना म्हणजे ऑगस्ट महिना सुरु होत आहे. ऑगस्टमध्ये देशातील सुट्ट्यांमुळे वेगवेगळ्या भागांतील बँका १३ दिवस बंद राहणार आहेत. यात रविवारी आणि महिन्याचा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.
१ ऑगस्टला बकरी ईदची सुट्टी आहे. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी २ ऑगस्टला रविवार आहे. ३ ऑगस्टला सोमवारी रक्षाबंधनची सुट्टी असणार आहे. ८ ऑगस्टला महिन्याचा दुसरा शनिवार तर ९ ऑगस्टला रविवार येतो. १२ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
त्यानंतर १३ ऑगस्टला पेट्रियोट डे निमित्ताने इम्फाल झोनमधील बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी सुट्टी आहे. २० ऑगस्टला श्रीमंत संकारादेव तिथीनिमित्ताने आसाममधील गुवाहाटी विभागातील बँका बंद राहणार आहेत. २१ ऑगस्टला हरितालिका असून या दिवशी बँकांना सुट्टी राहणार आहे. २२ ऑगस्टला गणेशचतुर्थीची सुट्टी असणार आहे. २९ ऑगस्टला विश्वकर्मा पूजा निमित्ताने बँका बंद राहतील. तर महिनाचा शेवटचा दिवस ३१ ऑगस्ट रोजी थिरु ओणमची सुट्टी राहणार आहे.