महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑक्टोबर ।। ऑक्टोबर महिना संपायला शेवटचा एक आठवडा शिल्लक आहे. नोव्हेंबर महिना दिवाळी आणि इतर सण घेऊन येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. असे नियम ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडणार आहे. यामध्ये रेल्वे तिकीटांच्या नियमातील बदल सर्वात मोठा आहे. काय आहेत हे नियम? जाणून घेऊया.
तिकिट रिझर्व्हेशनची मुदत
भारतीय रेल्वेकडून आगाऊ आरक्षणाची मुदत आता 120 दिवसांवरून 60 दिवसांवर आणली जाणार आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. असे असले तरी ताज एक्सप्रेस आणि गोमती एक्सप्रेसच्या बाबतीत कोणताही बदल होणार नाही. परदेशी पर्यटकांसाठी दिवसांची मर्यादा नसेल. आतापर्यंत प्रवासी 4 महिने अगोदर म्हणजेच 120 दिवस आधी त्यांची जागा आरक्षित करू शकत होते.
तत्काळ तिकीट बुकिंग
IRCTC वरून दररोज 125 लाख तिकीट बुक केले जातात. तात्काळ तिकीट बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी केली जाऊ शकते. 1 नोव्हेंबरपासून आगाऊ रेल्वे तिकीट बुकिंगच्या नवीन नियमांचा त्या बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही.
सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती
सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जाहीर केल्या जातात. यासाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.
डेरिव्हेटिव्ह
मार्केट रेग्युलेटरी सेबीने इंडेक्स डेरिव्हेटिव्हच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये काँन्ट्रक्ट साइज आणि किमान गुंतवणुकीच्या नियमाचा समावेश आहे. या नियमांमध्ये साप्ताहिक एक्सपायरी मर्यादित करण्याचादेखील समावेश आहे.
क्रेडीट कार्डचे नियम
जर तुम्ही वीज, गॅस आणि पाण्याची बिले भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे, SBI ने क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे कार्डच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल भरण्यावर 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
कॅनडाच्या जस्टिन ट्रुडो सरकारने बाहेरच्या देशातून येणाऱ्या तात्पुरत्या निवासींची संख्या कमी करण्यासाठी नियमात बदल केलाय. हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. भारतातून परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी कॅनडा हे आवडते ठिकाण असल्याने या बदलांचा भारतीयांवर मोठा परिणाम होणार आहे.
वर्क परमिट प्रोग्राममध्ये बदल
कॅनडा सरकारने वर्क परमिट प्रोग्राममध्ये बदल जाहीर केले आहेत. हे बदल 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होतील. हे नियम पोस्ट ग्रॅज्युएट वर्क परमिट प्रोग्राम (PGWP) साठी लागू करण्यात आले आहेत.