महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑक्टोबर ।। पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी कोसळून ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोसरीच्या सदगुरू नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी सद्गुरूनगरला सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बिल्डरने तकलादू बांधलेली पाण्याची टाकी कोसळून पाच बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या आहेत. पण मृत कामगारांचा मृतदेह काढण्यास नागरिकांनी विरोध केला आहे.