‘वरळीतून तुला…’ संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज ! म्हणाले ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑक्टोबर ।। मुंबईमधील सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे वरळी मतदारसंघ! यंदाच्या विधानसभा निवडणुकीला या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं विशेष लक्ष असणार आहे. यामागील कारण म्हणजे या ठिकाणी ठाकरे विरुद्ध ठाकरे असा समाना पहायला मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि वरळीचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंविरुद्ध त्यांचे काका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार दिला आहे. मनसेच्या स्थापना झाल्यापासून सोबत असलेल्या संदीप देशपांडे यांना पक्षाने वरळीमधून उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये पहिल्यांदा आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली तेव्हा मनसेनं उमेदवार दिला नव्हता. यंदा मात्र दोन्ही सेनेमध्ये इथे काँटे की टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच संदीत देशपांडे यांच्या प्रचारासाठी वरळीमध्ये मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पुतण्या आदित्यविरोधात मैदानात असलेल्या संदीप देशपांडेंना एक विशेष संदेश दिला आहे.

राज ठाकरेंनी केलं उद्घाटन
राज ठाकरेंच्या हस्ते लाल फित कापून राज ठाकरेंनी मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर राज ठाकरेंनी या कार्यालयाची पहाणी करुन काही सल्ले संदीप देशपांडेंना दिले. त्यानंतर राज ठाकरेंना अभिप्राय लिहिण्यासाठी एक कॉफी टेबल बुकप्रमाणे कॅटलॉग देण्यात आलं. यामध्ये कोऱ्या पानांवर राज ठाकरेंचा फोटो छापण्यात आलेला. या कॅटलॉगमध्ये राज ठाकरेंनी संदीप देशपांडेंसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक विशेष संदेश दिला. राज ठाकरेंनी आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये या अभिप्राय नोंदवणाऱ्या कॅटलॉगमध्ये लिहिलेल्या वाक्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

 

राज ठाकरेंनी काय सल्ला दिला?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर संदीप देशपांडेंचा उल्लेख करत अभिप्राय वहीत, “प्रिय संदिप देशपांडे, सस्नेह जय महाराष्ट्र! वरळीतून तुला निवडून यावचं लागेल! शुभेच्छा” असा संदेश लिहिला.

A post shared by Sandeep Deshpande (@sandeep_deshpande_adhikrut)

या खाली राज यांनी स्वक्षारी करुन तारीखही टाकली. विशेष म्हणजे राज यांचे पुत्र अमित ठाकरे स्वत: महीममधून निवडणूक लढवत आहेत.

 

राज ठाकरेंच्या पुत्राविरोधात शिंदेंचा तगडा उमेदवार
राज ठाकरेंचे पुत्र अमित हे महिममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सदा सरवणकर यांच्या रुपात तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे माहिममध्ये मनसेचा आणि पर्यायाने अमित ठाकरेंचा कस लागणार आहे. या लढतीकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *